
जेव्हा मी एकाच वेळी चार-चार वडापाव खायचो - श्रेयस अय्यर मुंबईत जन्मलो, येथेच वाढलो. लहानपणापासून घरात, सोसायटीच्या परिसरात क्रिकेट खेळायचो. भोवताली वातावरणही क्रिकेटचेच. गल्लीतील खेळानंतर पुढे शालेय स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला लागलो. शाळेत, घरी आणि परिसरात बालपणापासूनच माझ्यातील आक्रमक फलंदाज दिसू लागला. शालेय स्पर्धेत माझा फटका मारण्याचा अंदाज वेगळा होता आणि मी मोठमोठे शॉट्स सहज मारत असे. त्यामुळे प्रशिक्षकांचेही माझ्यावर विशेष लक्ष गेले. पुढे वडिलांनी शिवाजी पार्क जिमखान्यात प्रशिक्षणासाठी दाखल केले. येथे खरे मार्गदर्शन आणि अनुभवी प्रशिक्षक मिळाले. मी इतर मुलांसारखाच सामान्य खेळाडू होतो, पण आक्रमक फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे वेगळी ओळख तयार होत गेली. शालेयपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेपर्यंत मग रणजी ट्रॉफी असो की, आयपीएल हंगामातील कामगिरी.. खांद्याच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ खेळापासून लांब राहणं असो की पुनरागमन करून उत्कृष्ट खेळीचं प्रदर्शन.. अशा कैक प्रसंगातून मी शिकत आलो आणि ते पुढे जात आहे. ही एक यात्रा आहे; असे काही नाही की जे एका रात्रीत मिळून जाईल. पण तुम्ही एखाद्य...