माल् या आज्याले बहाड्या बैलाचं सपन दिसलं.. आमचा आजीले नांदाच असे, 'आजी काईतरी कायनी सांग..... कायनी सांग...' तिच्याजोळ काई गप्पाईचं पोतं नवतं. तिनं एकच कायनी लय खेप सांगेल हाय.. आम्ही बी तेच ते आयको.. मंग आजीच्या कायनीले सुरूवात व्हायची.., ''आपल्या घरी पैले होंडक्या शिंगाचा बहाडा बैल होता. गावामंदी चारा नसला की, बैलं पाहाडात पाठवा लागत. मंग सन्या त्या साली बहाड्याले बी जंगलातच पाठोलं.. उनाया होता... वावरात काही कामंधामंबी नवता.'' आजी कायनी सांगे आमी नुसतं '' हुं हुं '' म्हणून आयकत जायचो..झोप येईस्तोवर असं चालेच. '' सातपुड्याच्या पाहाडात बैलं घिऊन जाणा-या लोकाईले आपून जवारी द्याचो.. सूर्य डुबेलोक बैलं पाहाडाईत चरत.. त्याईच्या दोनी कुसा तंग फुगल्या की, गुराखी लोकं ठाण मांडेल जागेवर बैल बांधत...जेवत अन् झोपी जात.. '' हुं हुं करत आमी गुंगावल्यासारखे बोलत होतो. '' चारा नसला की, बैलाईचे हाडकं उघडे पडतं.. असे हालं पाऊन आपल्यालेबी काहाची भाकर धकते मंग.. बहाडा होताबी च...
Posts
Showing posts from September, 2015