
आय लव्ह यू औरंगाबाद.. राज्यातील मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र शिवाय ऐतिहासिक पर्यटनकेंद्र म्हणून औरंगाबादची ओळख आहे. मराठवाड्याची राजधानी असलेली ही नगरी जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे. नोकरी, शिक्षणानिमित्त विदर्भ, मराठवाड्यातील तरुण मोठ्या आशेनं औरंगाबादकडे पाहतात. गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी औरंगाबाद पुण्या मुंबईसारखे आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळी देशी, विदेशी पर्यटकही बारोमास (विशेष पावसाळ्यात) येतात. अशा या लाडक्या औरंगाबादची काही खास वैशिष्ट्ये या संग्रहातून पाहूया.. औद्योगिकदृष््या औरंगाबाद हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. वाहने व वाहनांचे पार्ट, बिअर आणि व्हिस्की, औषधे, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने आहेत. विविध देशी आणि विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योग समुहांचे प्रकल्प औरंगाबादमध्ये आहेत. औरंगाबादला आम्ही लाड, कौतुकाने छोटी मुबंईही म्हणतो. या शहराची मेट्रोसिटी कडे जोरदार वाटचाल सुरू आहे. शैक्षणिक विकासातही औरंगाबाद मागे नाही. शहरामध्ये विविध शिक...