आय लव्ह यू औरंगाबाद..
राज्यातील मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र शिवाय ऐतिहासिक पर्यटनकेंद्र म्हणून औरंगाबादची ओळख आहे. मराठवाड्याची राजधानी असलेली ही नगरी जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर आहे. नोकरी, शिक्षणानिमित्त विदर्भ, मराठवाड्यातील तरुण मोठ्या आशेनं औरंगाबादकडे पाहतात. गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी औरंगाबाद पुण्या मुंबईसारखे आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळी देशी, विदेशी पर्यटकही बारोमास (विशेष पावसाळ्यात) येतात. अशा या लाडक्या औरंगाबादची काही खास वैशिष्ट्ये या संग्रहातून पाहूया..
 |
औद्योगिकदृष््या औरंगाबाद हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. वाहने व वाहनांचे पार्ट, बिअर आणि व्हिस्की, औषधे, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने आहेत. |
 |
विविध देशी आणि विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योग समुहांचे प्रकल्प औरंगाबादमध्ये आहेत. औरंगाबादला आम्ही लाड, कौतुकाने छोटी मुबंईही म्हणतो. या शहराची मेट्रोसिटी कडे जोरदार वाटचाल सुरू आहे. |
|
 |
शैक्षणिक विकासातही औरंगाबाद मागे नाही. शहरामध्ये विविध शिक्षण संस्था आहे. नावाजलेल्या शिक्षण संस्था असल्यामुळे येथे देशभरातुनच नव्हे, तर जगभरातुन विद्यार्थी येतात. |
 |
| औरंगाबादमधील चिकलठाना येथे विमानतळ आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदयपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूरसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. |
|
 |
रस्त्यांनी औरंगाबाद राज्यातील प्रमुख शहरांना जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 या शहरातून जातो. जालना, पुणे, अहमदनगर, नागपूर, बीड आणि मुंबई औरंगाबादशी जुडली आहे. |
 |
औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. |
 |
गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत. |
 |
दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्वाचा स्टॉप म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानण्यात येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस, लोकर व वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय येथे फार वर्षांपासून चालतो. |
 |
........................................................................................................................................................................................................ |
 |
........................................................................................................................................................................................................ |
|
 |
संग्रहातील सर्व फोटोही औरंगाबादेतील रस्त्यांचे आहेत. वाहनचालकांनी या रस्त्यांची सवय करून घेतली आहे. |
Comments
Post a Comment