Posts

Showing posts from March, 2017

दहावीत जेव्हा मी काॅपी केली..

दहावीत जेव्हा मी काॅपी केली..  दहावीत भुमितीच्या पेपरला मी एक कॉपी नेली. सर म्हणत होते, "पोराईहो हा प्रश्न पाच मार्कांसाठी येणारच.'' परीक्षा केंद्र होतं खामगाव तालुक्‍यातील एक जिल्हा परिषदेची शाळा. 'निर्रा कॉप्यांचा महापूर.' परीक्षा सुरू झाली की, शाळेत येऊन पालक कॉप्या देत. धाड पथक आलचं तर, ऑफिसात चहा पाण्यात गुंग ठेवल्या जात असे. सर्वांचं अगदी शुद्धीत या प्रकाराकडे लक्ष असायचं. "पण गरीबाची पोरं बिचारी पास होतात तर, होऊद्या" असे "पुण्य घेण्याचे' काम शिक्षक करत.  मोठ्या हिमतीनं मी कॉपी काढली.. अर्ध अधिक गणीत उतरवलं. केंद्रप्रमुख का कुणीतरी ओरडत आलं, ""अरे बुलडाण्याहून पथक आलं. फेका फेका..'' एक चपराशी पोतं घेऊन वर्गात फिरू लागला. पोरं भराभर खिशातल्या कॉप्या पोत्यात रिचवू लागली. मी घाईघाईत जवळ असलेली एकमेव कॉपी खिशात कोंबली होती. ती पोत्यात टाकण्याच्या तयारीत तसा चपराशी ओरडला. ""तोंड काय पायतं.. टाक पटकन.'' क्षणाचाही विलंब न लावता जे खिशात असेल ते मी पोत्यात फेकलं. नंतर लक्षात आलं, हॉलतिकीट अन्‌ वीस...