Posts

Showing posts from November, 2017
“बाप्पा आमचे पोरं ताने होते, तं त्याईले उरई होत जाय. ता काहाचेरे एवढे डाकटर. मंग आमची माय पानाचा थुका पाज्याले लावे पोराले.” मी किळसवाणं तोड करून “व‍ॅक” केलं. तोंड मेल्याहून मेल्यासारखं झालं. "दिवईले आला का रे बाबू'' पानाचा चोथा नालीत फेकून लुगड्याच्या पदरानं तोंड पुसत अनसाबाईनं विचारलं. मी : "हो आजी ! कशी हाय तब्बेत'' "सुचत नाही रे बाबू आता, हात पाय काम नाई करत, पाठ दुखते, कानाले आयकू नाई येत.'' "भाकर खाल्ली की, एका जागी बसत जायनं बा.. भाईर काहाले फिरतं. चक्कर इऊन पडली बिडली तर कोण करीन तुयं'', अनसाईच्या खाटेवर बुड टेकवत मी बोललो. "जाऊदे बाप्पा ! हो आता काई बी, तू सांग कसा हायस.. माय खुशाल हाय ?..!'' अनसाईनं विचारलं. बरं वाटलं. अनसुयाबाई उर्फ अनसा. वय सुमारे 85 पार, तरी दातांची पंगत शाबूत. ऐकू येत नसले तरी नजर तेज आहे. आज रक्ताच्या नात्यातली लोक परकी होतात. स्वार्थापुरती बोलतात. भांडतात. दूर होतात. भेटली की खोटं हसतात. खाेटं बाेलतात. आैपचारिकतेने ख्याली खुशाली घेतात. पण प्रेमानं जुळणारी मानसं तुटत नाहीत. मीटत नाहीत. च...