“बाप्पा आमचे पोरं ताने होते, तं त्याईले उरई होत जाय. ता काहाचेरे एवढे डाकटर. मंग आमची माय पानाचा थुका पाज्याले लावे पोराले.” मी किळसवाणं तोड करून “वॅक” केलं. तोंड मेल्याहून मेल्यासारखं झालं.
"दिवईले आला का रे बाबू''
पानाचा चोथा नालीत फेकून लुगड्याच्या पदरानं तोंड पुसत अनसाबाईनं विचारलं.
मी : "हो आजी ! कशी हाय तब्बेत''
"सुचत नाही रे बाबू आता, हात पाय काम नाई करत, पाठ दुखते, कानाले आयकू नाई येत.''
"भाकर खाल्ली की, एका जागी बसत जायनं बा.. भाईर काहाले फिरतं. चक्कर इऊन पडली बिडली तर कोण करीन तुयं'', अनसाईच्या खाटेवर बुड टेकवत मी बोललो.
"जाऊदे बाप्पा ! हो आता काई बी, तू सांग कसा हायस.. माय खुशाल हाय ?..!''
अनसाईनं विचारलं. बरं वाटलं. अनसुयाबाई उर्फ अनसा. वय सुमारे 85 पार, तरी दातांची पंगत शाबूत. ऐकू येत नसले तरी नजर तेज आहे. आज रक्ताच्या नात्यातली लोक परकी होतात. स्वार्थापुरती बोलतात. भांडतात. दूर होतात. भेटली की खोटं हसतात. खाेटं बाेलतात. आैपचारिकतेने ख्याली खुशाली घेतात. पण प्रेमानं जुळणारी मानसं तुटत नाहीत. मीटत नाहीत. चेहऱ्यापुढून पुसत नाहीत. चांगल्या-वांगल्या अनुभवांनी त्यांनी मनं घोटीव प्रेमळ बनतात. अशा चेहऱ्यांकडे धन, दौलत, पद, पैसा प्रतिष्ठा नसली तरी त्यांचे मायेचे दोन शब्द भक्कम आधार देणारे वाटतात. अशातलीच एक अनसाबाई. कळकट-मळकट वातावरणात वाढलेली श्रीमंत मनाची बाई.
"अऊरंगाबादलेच असतं ना तू''
मी - "हो...!''
"बरा मारला बापा चक्कर आज इकडे''
"आलतो असचं...बाम हाय का बाम..''
"हव हाय ना..'' कमरेला खोचलेली पिवशी काढत अनसाई बोलली.
“उरई (सर्दी) झाली कारे तुले... आवाज बदलला”
मी होकारार्थी मान हलवत. “हाव ना.. बसूनच नाही रायली आजी उरई.. दवाखान्यातबी गेलतो.”
“पानाचा तुकडा खायनं.. दिऊ का ?” पुन्हा पिवशीकडं हात नेत अनसाई बोलली.
“नाई वं आजी.. काईबी का.. पानानं बसते का उरई. तोंड रंगते सरं.. सुदई नाई दिसत ते..” मी बामीचं बोट डोक्यावर धरलं. झाकण हुंगलं.
अनसाईनं डबी उघडून बामीचा भला मोठा पेंड हातापायावर चोळला.
“बापा.. आता तुमच्या जमान्याततं तरेतरेचे दावखाने हायत.. उलसक काई झालं की, दावखाना.. तुटेल माणसं जुटतात आता दावखान्यात. माणसं निरा पोकय झाले. प्याचं पाणी बदललं की उरई.. अरे परवा तं ठोकर लागून मेला आपल्या गावात एक जण. उलसेक घोपरं, पण किती त्याईचा दावखान्याचा खर्च.. तापा निरा सुरूच असतात. ज्याची त्याची अैलरजी पेराईले. आमचे पोरं तं म्हशीच्या गवानीत खेत.. गोचीड चिकपत त्याईले.. वावरात गेले की धसं, खुटल्या घुसत पायात. पण दावखाना नव्हता माइत..”
“पयल्यासारखं रायनीमान नाही ना आजी आता” मी बोललो.
अनसाई काही आवरतं घेईना. “अरे खायना पान.. दिऊ का ?”
“बाप्पा आमचे पोरं ताने होते, तं त्याईले उरई होत जाय. ता काहाचेरे एवढे डाकटर. मंग आमची माय पानाचा थुका पाज्याले लावे पोराले.”
मी किळसवाणं तोड करून “वॅक” केलं. तोंड मेल्याहून मेल्यासारखं झालं. “काईबी सांगतं का वं आजी.”
“होना बाप्पा काय सांगा तुले..
बायतीन बाई असली की, पान, चुना, सुपारी त्यात शोपा, ववा, मीऱ्याचा एक दाना, सुठ असं पान खात बाया.. तान्या लेकराले उरई असली की, रातरात लेकरं तरास देत, त्याईच्या छातीत कफ दाटे, त्याले सुवास नाई घेता ये. रातभर लेकरासंग मायबी परेशान, मंग ते पान चाऊन त्याचा चमचाभर थुका पोराले पाजा लागे.."
नुसती कल्पना करून किळस यावी अस काही अनसाबाई सांगत होती.
“मायच्या थुक्यानं काई ना हाेये लेकराले.. आमच्या पाेराईले आतासारखे वफारे नसतं. दवाखाने नसत. अैलरजी नसे. शेणामातीत, गव्हाणीत, हिवात, दवात, वावरात कुटीबी पडून रायत पाेरं.. तं आमाले फिकर नसे..”
अनसाई सांगत हाेती.
- महेश घाेराळे

Comments
Post a Comment