Posts

Showing posts from April, 2018

भेंडवळची घटमांडणा आणि विदर्भातील कास्तकार

Image
घटमांडणीत समुद्राचे प्रतिक म्हणूनमातीचे मडके त्यावर सांडाेई, कुरडई व चारमहिन्यांचे प्रतिक म्हणून मडक्याला आधार असलेले मातीचे ढेकळं. अ खोजीच्या(अक्षय तृतीयेच्या) मुहूर्तावर भेंडवळची (जि. बुलडाणा) घटमांडणी ( भविष्यवाणी )पार पडली नि सोशल मीडियावर श्रद्धा-अंधश्रद्धेच्या चर्चेला ऊत आला. अनेकजण ही भविष्यवाणी म्हणजे शेतकऱ्यांची फसवेगीरी असल्याचे सांगतात. तर, तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या घटमांडणीची भविष्यवाणी बहुतांश वर्षी तंतोतंत खरी ठरल्याचा दावाही अनेक शेतकरी करतात. नव्हे तर, विदर्भातील हजारो शेतकरी आजही भेंडवळच्या भविष्यवाणीचा आधार घेत पिकं ठरवतात, हेही तेवढचं खरं. घटमांडणीतील पिक पाऊस, राजकारण, सुरक्षेविषयी भविष्यवाणी एेकण्यासाठी जमलेले शेतकरी बांधव. अक्षय तृतियेनंतर गुरुवारी येणारा खामगावचा बाजार अन्‌ सोमवार, मंगळवारी येणारा नांदूरा, शेगावचा आठवडी बाजार पाहा. जागोजागी शेतकऱ्यांमध्ये घटमांडणी आणि पिक पाण्याच्या गप्पा सुरू असतात. काही प्रकाशकांकडून या मांडणीतील भाकितांचे पुस्तकही बाजारात विकले जाते. दरवर्षी न चुकता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरही या भविष्...