त्या कोरोनावर लिव लय हाल केले उबार्यानं ! "औ भाऊ तोंड पाह्यत नका बसू लवकर लवकर घ्या.. कांदे तीस रुपये किलो, पालक दहाची गड्डी, वांगे, गवार, कैरी पंधरा रुपये पाव.'' भाजीवाली मावशी तावातावानं गिर्हाईकापुढं रिकामे टोपले फेकत होती. मोजलेला भाजीपाला थैलीत भरून एकेकाला रवाना करत होती. जास्त भाव करायची किंवा भाजी निवडायची सोय नव्हती. "मावशी आज जरा लयचं घाई करून रायली बाप्पा'' हिंम्मत करून बोललोच. "घाई करू नाई तर काय. पोलिसाची गाडी आता उरावर ठ्या दिशी उबी रायते. भाजी पाल्याची गाडी रस्त्यावर उलंडून देली म्हंजे. लोकाईले काय हाय. त्याईले कोरोना काय अन फोरोना काय ? सारे दिवस सारखे. रस्त्यावर गाडी लावली तर पोलिसं हाकलतात....सांग पटकन काय दिऊ तुले..?'' तेवढ्यात एक आबाजी आले. एका हाती दुधाची पिशवी, काखेत बहुधा पासबुक वगैरेची प्लास्टिक पिशवी. "बाई..! काय म्हंतात वांगे'' "काहीच नाही म्हणत ते.. बोलत नाईत.'' मावशी जरा जास्तच कडाडली. "घ्या घोर.. अवं माय म्हंजे काय भाव हायत'' "पंध्रा रुपये पाव'' ...
Posts
Showing posts from 2020