Posts

Showing posts from April, 2022

बाबासाहेबांना पाहण्यासाठी अकोला स्टेशनवर दहा मिनीटे थांबवली होती रेल्वे

Image
बाबासाहेबांना पाहण्यासाठी अकोला स्टेशनवर दहा मिनीटे थांबवली होती रेल्वे अकोल्यातील शाहीर वसंत मानवटकर सांगतात, तो काळ १९४७ च्या दरम्यानचा असावा. मी खूप लहान होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर अनुयायांची प्रचंड गर्दी जमली होती. बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहता यावे यासाठी अनुयायी, कार्यकर्त्यांनी हातची कामं सोडून स्थानक गाठलं होतं. लोक मुंबईहून येणाऱ्या रेल्वेकडे डोळे लाऊन बसले होते. अखेर रेल्वे आली. बाबासाहेब स्थानकावर उतरले नि त्यांच्या भोवती एकच गर्दी झाली होती. यावेळी दहा मिनीटे रेल्वे स्थानकावर थांबली होती. डोक्यावर हॅट, अंगावर पूर्ण खाकी गणवेष, कमरेला भलामोठा पट्टा आणि भारदस्त शरीरयष्टी असे बाबासाहेबांचे ते रुबाबदार रुप अजूनही डोळ्यासमोर येते. या आठवणी जागवल्या आहेत शहरातील ज्येष्ठ शाहीर वसंत प्रल्हाद मानवटकर यांनी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ शाहीर वसंत मानवटकर यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत डॉ. आंबेडकर यांना अकोला रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष पाहिल्याचा प्रसंग सांगितला. ते सांगतात, एकदा डॉ. बाबासाहेब आं...