दीनांना प्रतिक्षा अच्छा दिनांची..

दीनांना प्रतिक्षा अच्छा दिनांची.. बड्या बड्या आश्वासनांच्या जोरावर दोन्ही प्रमुख पक्षांनी राज्यात सत्ता भोगली. मात्र, शेतक-यांच्या पाचवीला पुंजलेल्या दुष्काळाचा नायनाट करण्यात भाजपासह कॉंग्रेसही अपयशी ठरली. शेतीचा कायापाटल व्हावा, शेतक-यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी अखिल कृषक समाजाने दोन्ही पक्षांना संधी दिली. मात्र, दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या या समस्या आजही कायम आहेत, नव्हे तर त्यांनी भयानक रूप धारण केले आहे. त्यामुळे कृषीप्रधान देशाच्या विकासाची नस अजूनही सत्ताधा-यांना गवसली नाही, असे म्हणावे लागेल. मोदी सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा फुगा फुटतो की, काय अशी चिंता ग्रामीण भागातून कानी येत आहे. साखर महाग पण ऊस नाही, कापड महाग पण कापूस नाही हे वर्षानुवर्षांपासूनचे गणित त्रासदायक ठरत आहे. "जखम पायाला मलम कपाळाला' हा सत्ताधा-यांचा व्यवहार शेतक-यांना "भुई'त घालणारा आहे. विमानाने दौरे करून, चार- दोन शेतक-यांच्या घरी सेलेब्रिटीसारखे फिरून दुष्काळ किंवा शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासारखे/समजण्यासारखे नाहीत. सर...