
शेंबडी पाेरं अन् गुलाबी दुध.. नां दुरा (बुलडाणा) येथील नगर परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिकत हाेताे. चार दिवसांपुर्वी या शाळेत जाता आलं. 23 वर्षानंतर शाळा पाहिली नि पहिला वर्ग आठवला. बाजाराच्या पिशव्या घेऊन शेंबड्या नाकानं शाळेत येणारी मित्र आठवले, टकल्यावर घाम येईस्ताेवर पाेरांना कुट कुट कुटणारे पाटील सर आठवले, ''शेजारच्या कन्या शाळेत जाऊ नये'', असे दिवसातून किमान तीन ते चारवेळा सांगणा-या देशमुखबाई आठवल्या. लेखना खाणा-या, वर्गात चिंचाेके खेळणा-या झिप-या पाेरी आठवल्या . शाळेला तशी इमारत नव्हती. ठेंगण्या दरवाज्यातून वाकून वर्गात जावे लागे. टीनशेडचे वर्ग. शेजारीच मुतारी. लागूनच भाऊसाहेब अर्थात मुख्याध्यापकांची `गुहा` (हाेय, गुहाच. तेव्हा भाऊसाहेबांचा दराराच तसा असायचा.) जेवणाच्या सुटीत व्हरांड्यात पाेरं डबे उघडत. त्याआधी 12 च्या सुटीत गुलाबी दुध मिळायचं (आताच्या भाषेत - राेझ फ्लेवरचं दुध), त्यासाठी पाेरं घरून माेठमाेठी भांडे घेऊन येत. 'दूध घरी न्यायचं नाही' अशी ताकीद गुरूजी देत असतं. शाळेच्या गेटवर चिंचा, बाेरं विकणारी आजीबाई असायची. मारकुट्या ...