शहंशाह अमिताभ




हिंदी सिनेमाच्या "शहंशाह'ने वयाची पंच्चाहत्तरी गाठली. पण त्याचं "डॉन'पण आजही कमी झालं नाही. कोट्यावधी लोकांच्या "महोब्बत'ची न तुटणारी "दिवार' या मानसानं जोडली. सिनेमाला लाभलेला हा "मर्द'गडी भारतीयांची खरी "शान' आहे. पण आज चित्र बदललं. मोठ्या अभिनेत्यांचे चेहरे डोळ्यासमोर ठेऊन हजारो तरुण मुंबई गाठतात. वय वाढत जातं पण "रोटी कपड़ा और मकान'चे प्रश्न सुटत नाहीत. पडद्यामागचं विचित्र जग "हेराफेरी' करण्यास भाग पाडतं. पण कुठे संधी मिळत नाही. कारण "आरक्षण' इथे चालत नाही. "याराना' असलाच तर साईडरोल मिळेलही. पण एखाद्याच चित्रपटात. मग "मजबूर' होऊन एखाद्या शहरात "चुपके चुपके' जाहिराती करण्यावर वेळ येते. या चंदेरी दुनियेच्या नादानं अनेकजण "शराबी' होऊन आज समाजात "लावारिस' आहेत.
- महेश घोराळे, औरंगाबाद..

Comments

Popular posts from this blog

कुणी घर देता का घर?