Posts

Showing posts from 2015

दीनांना प्रतिक्षा अच्‍छा दिनांची..

Image
दीनांना प्रतिक्षा अच्‍छा दिनांची.. बड्या बड्या आश्‍वासनांच्‍या जोरावर दोन्‍ही प्रमुख पक्षांनी राज्‍यात सत्‍ता भोगली. मात्र, शेतक-यांच्‍या पाचवीला पुंजलेल्‍या दुष्‍काळाचा नायनाट करण्‍यात भाजपासह कॉंग्रेसही अपयशी ठरली. शेतीचा कायापाटल व्‍हावा, शेतक-यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी अखिल कृषक समाजाने दोन्‍ही पक्षांना संधी दिली. मात्र, दुष्‍काळ, पाणीटंचाई, शेतकरी आत्‍महत्‍या या समस्‍या आजही कायम आहेत, नव्‍हे तर त्‍यांनी भयानक रूप धारण केले आहे. त्‍यामुळे कृषीप्रधान देशाच्‍या विकासाची नस अजूनही सत्‍ताधा-यांना गवसली नाही, असे म्‍हणावे लागेल. मोदी सरकारकडून असलेल्‍या अपेक्षांचा फुगा फुटतो की, काय अशी चिंता ग्रामीण भागातून कानी येत आहे. साखर महाग पण ऊस नाही, कापड महाग पण कापूस नाही हे वर्षानुवर्षांपासूनचे गणित त्रासदायक ठरत आहे. "जखम पायाला मलम कपाळाला' हा सत्‍ताधा-यांचा व्‍यवहार शेतक-यांना "भुई'त घालणारा आहे. विमानाने दौरे करून, चार- दोन शेतक-यांच्‍या घरी सेलेब्रिटीसारखे फिरून दुष्‍काळ किंवा शेतक-यांचे प्रश्‍न सोडवण्‍यासारखे/समजण्‍यासारखे नाहीत. सर...
काशिरामभाऊ...  वावरातल्‍या कामानं त्‍याची हाडं मोकय होत व्‍हती.. कधीही पाहा तो घामानं डबडबलेलाच.. वय लगबग  पंच्‍याहत्‍तरीचं पण उत्‍साह तरण्‍याबांड पोरासारखा.. मीठ भाकरीसाठी धडपडणा-या आयुष्‍यातही तो कमालीचा  विनोद शोधायचा.. तो कुठंही असो.. आसपासची लोकं पोट दुखेस्‍तोवर हसायची.. काशिरामभाऊ तेव्‍हा होताच  तसा, आता वय वाढलं, तरी गुण मात्र कायम आहे.. वयानं वटवृक्षासारख्‍या या मानसाच्‍या सावलीत मी पण  खेळलो आहे. त्‍यांची संगत लाभलेल्‍यांना त्‍यांचे बरेच प्रसंग घट्ट आठवणीत राहण्‍यासारखे आहेत. त्‍यापैकी एक..  त्‍या गुरूवारी फाट्यावर भलतीच गर्दी होती. खामगांव बसची वाट पाहतं कॉलेजचे विसेक पोरं पोरी उभी होती.  त्‍यात एक मी पण होतो. गुरूवार बाजाराचा दिवस. काशिरामभाऊ झकपक पांढरे कपडे घालून पोराईच्‍या  घोळक्‍यात बसले होते. हा माणूसच असा की, साखरेच्‍या दाण्‍याभोवती मुंग्‍या जमाव्‍या. पोंरांमध्‍ये ते मिसळून  जात, तेव्‍हा गप्‍पांच्‍या विषयांना मर्यादा नसायची. कानोसा घेत मी ही या घोळक्‍यात सामील झालो. दूरून आणखी पाचेक लोकं याच दिशेनं येत होती. संपू,...
माल्‍ या आज्‍याले बहाड्या बैलाचं सपन दिसलं..  आमचा आजीले नांदाच असे, 'आजी काईतरी कायनी सांग..... कायनी सांग...' तिच्‍याजोळ काई गप्‍पाईचं पोतं नवतं. तिनं एकच कायनी लय खेप सांगेल हाय.. आम्‍ही बी तेच ते आयको..  मंग आजीच्‍या कायनीले सुरूवात व्‍हायची.., ''आपल्‍या घरी पैले होंडक्‍या शिंगाचा बहाडा बैल होता. गावामंदी चारा नसला की, बैलं पाहाडात पाठवा लागत. मंग सन्‍या त्‍या साली बहाड्याले बी जंगलातच पाठोलं.. उनाया होता... वावरात काही कामंधामंबी नवता.''  आजी कायनी सांगे आमी नुसतं '' हुं हुं '' म्‍हणून आयकत जायचो..झोप येईस्‍तोवर असं चालेच. '' सातपुड्याच्‍या पाहाडात बैलं घिऊन जाणा-या लोकाईले आपून जवारी द्याचो.. सूर्य डुबेलोक बैलं पाहाडाईत चरत.. त्‍याईच्‍या दोनी कुसा तंग फुगल्‍या की, गुराखी लोकं ठाण मांडेल जागेवर बैल बांधत...जेवत अन् झोपी जात.. ''  हुं हुं करत आमी गुंगावल्‍यासारखे बोलत होतो.  '' चारा नसला की, बैलाईचे हाडकं उघडे पडतं.. असे हालं पाऊन आपल्‍यालेबी काहाची भाकर धकते मंग.. बहाडा होताबी च...

mahesh ghorale amravati

Image

mahesh ghorale

Image

mahesh ghorale amravati

Image

mahesh ghorale amravati

Image

mahesh ghorale amravati divya marathi

Image