Posts

Showing posts from 2017
“बाप्पा आमचे पोरं ताने होते, तं त्याईले उरई होत जाय. ता काहाचेरे एवढे डाकटर. मंग आमची माय पानाचा थुका पाज्याले लावे पोराले.” मी किळसवाणं तोड करून “व‍ॅक” केलं. तोंड मेल्याहून मेल्यासारखं झालं. "दिवईले आला का रे बाबू'' पानाचा चोथा नालीत फेकून लुगड्याच्या पदरानं तोंड पुसत अनसाबाईनं विचारलं. मी : "हो आजी ! कशी हाय तब्बेत'' "सुचत नाही रे बाबू आता, हात पाय काम नाई करत, पाठ दुखते, कानाले आयकू नाई येत.'' "भाकर खाल्ली की, एका जागी बसत जायनं बा.. भाईर काहाले फिरतं. चक्कर इऊन पडली बिडली तर कोण करीन तुयं'', अनसाईच्या खाटेवर बुड टेकवत मी बोललो. "जाऊदे बाप्पा ! हो आता काई बी, तू सांग कसा हायस.. माय खुशाल हाय ?..!'' अनसाईनं विचारलं. बरं वाटलं. अनसुयाबाई उर्फ अनसा. वय सुमारे 85 पार, तरी दातांची पंगत शाबूत. ऐकू येत नसले तरी नजर तेज आहे. आज रक्ताच्या नात्यातली लोक परकी होतात. स्वार्थापुरती बोलतात. भांडतात. दूर होतात. भेटली की खोटं हसतात. खाेटं बाेलतात. आैपचारिकतेने ख्याली खुशाली घेतात. पण प्रेमानं जुळणारी मानसं तुटत नाहीत. मीटत नाहीत. च...

शहंशाह अमिताभ

Image
हिंदी सिनेमाच्या "शहंशाह'ने वयाची पंच्चाहत्तरी गाठली. पण त्याचं "डॉन'पण आजही कमी झालं नाही. कोट्यावधी लोकांच्या "महोब्बत'ची न तुटणारी "दिवार' या मानसानं जोडली. सिनेमाला लाभलेला हा "मर्द'गडी भारतीयांची खरी "शान' आहे. पण आज चित्र बदललं. मोठ्या अभिनेत्यांचे चेहरे डोळ्यासमोर ठेऊन हजारो तरुण मुंबई गाठतात. वय वाढत जातं पण "रोटी कपड़ा और मकान'चे प्रश्न सुटत नाहीत. पडद्यामागचं विचित्र जग "हेराफेरी' करण्यास भाग पाडतं. पण कुठे संधी मिळत नाही. कारण "आरक्षण' इथे चालत नाही. "याराना' असलाच तर साईडरोल मिळेलही. पण एखाद्याच चित्रपटात. मग "मजबूर' होऊन एखाद्या शहरात "चुपके चुपके' जाहिराती करण्यावर वेळ येते. या चंदेरी दुनियेच्या नादानं अनेकजण "शराबी' होऊन आज समाजात "लावारिस' आहेत. - महेश घोराळे, औरंगाबाद..

प्रिय एसटे तुझी किव येते..

Image
प्रिय एसटे तुझी किव येते... ---------------------------- आज कळतय मला.. आदळणारे दरवाजे, अन खिळखिळणाऱया खिडक्या घेऊन, राज्यभर हिंडणारी ती टपरी असाे, टुपरी असाे, पण माझी एसटी आहे. कुणी तिच्यावर दगड फेकाे कुणी पान खाऊन थुंकाे पण ती लाडकी लालपरी आहे ती बिचारी कुठेही पंक्चर झाली वाटेतच फाेडली गेली पण प्रवाशांना तिने वाऱयावर साेडले नाही.. मागच्या सिटवर तिने लाेकांचे मनके ताेडले पण कधी मनं ताेडले नाहीत रेटारेटी, भाडेवाढ, हमरीतुमरी पाहत ती खिळखिळी झाली पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भातल्या दगड धाेंड्यात गेली पण कधी नव्या साजासाठी भांडली नाही तिने कधीही हट्ट मांडला नाही की मला गुबगुबीत सीटं द्या आरामदायक खुर्च्या द्या आत टीव्ही किंवा एसी द्या बिचारी दिलेल्या वायफायमध्ये समाधानी आहे नखं, पेन किंवा कलदार हाती घेऊन टवाळखाेर पाेरांनी... तिच्या चारित्र्यावर डाग लावले कुणी दिलच्या आकारात RJ, PK, KP, I Love you सारखी अक्षरं लिहून प्रेमभावना व्यक्त केल्या पण एसटे तू तक्रारली नाहीस अग काही प्रेमविरांना तर चुंबनासाठी तुझ्या मागच्या सिटचा काेपरा आजही सेफ वाटताे.. ...
Image
शेंबडी पाेरं अन् गुलाबी दुध.. नां दुरा (बुलडाणा) येथील नगर परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिकत हाेताे. चार दिवसांपुर्वी या शाळेत जाता आलं. 23 वर्षानंतर शाळा पाहिली नि पहिला वर्ग आठवला. बाजाराच्या पिशव्या घेऊन शेंबड्या नाकानं शाळेत येणारी मित्र आठवले, टकल्यावर घाम येईस्ताेवर पाेरांना कुट कुट कुटणारे पाटील सर आठवले, ''शेजारच्या कन्या शाळेत जाऊ नये'', असे दिवसातून किमान तीन ते चारवेळा सांगणा-या देशमुखबाई आठवल्या. लेखना खाणा-या, वर्गात चिंचाेके खेळणा-या झिप-या पाेरी आठवल्या . शाळेला तशी इमारत नव्हती. ठेंगण्या दरवाज्यातून वाकून वर्गात जावे लागे. टीनशेडचे वर्ग. शेजारीच मुतारी. लागूनच भाऊसाहेब अर्थात मुख्याध्यापकांची `गुहा` (हाेय, गुहाच. तेव्हा भाऊसाहेबांचा दराराच तसा असायचा.) जेवणाच्या सुटीत व्हरांड्यात पाेरं डबे उघडत. त्याआधी 12 च्या सुटीत गुलाबी दुध मिळायचं (आताच्या भाषेत - राेझ फ्लेवरचं दुध), त्यासाठी पाेरं घरून माेठमाेठी भांडे घेऊन येत. 'दूध घरी न्यायचं नाही' अशी ताकीद गुरूजी देत असतं. शाळेच्या गेटवर चिंचा, बाेरं विकणारी आजीबाई असायची. मारकुट्या ...

कुणी घर देता का घर?

Image
कुणी घर देता का घर? घरासमोर शिल्लक राहिलेल्या बागेत किंवा छतावर चिऊताईला दाणा-पाणी देण्यासाठी आज लाखो हात समोर येतात; पण सिमेंटच्या घरांभोवती यायला ती तयार नाही. जागोजागी एसी, कुलर, काचा आणि पडद्यांनी झाकलेल्या खिडक्‍या, बागेची झालेली पार्किंग अशा वातावरणात घरटं कुठे बांधायचं, हा प्रश्न तिच्यासमोर आहे. शहराला दुरावलेली चिऊताई आज अंगाई गीतं किंवा चिऊ-काऊच्या गोष्टीपुरतीच कुठेतरी शिल्लक आहे. नाही तर कैक चिमुकल्यांना आया मोबाईलमधला "अँग्रीबर्ड' खेळवत झोपवतात. हे वास्तव आहे. उन्हाळा सुरू झाला म्हणून घरामागच्या आडोशाला पाखरांसाठी दाणे, पाणी ठेवलं. एरवी कावळा, कबुतरं, टिटवी किंवा भरटकलेला पोपट घरामागच्या बागेत येतो; पण गेल्या पंधरवड्यातल्या निरीक्षणात चिऊताई ना पाण्यासाठी फिरकली ना दाण्यासाठी. वाढते  शहरीकरण, घरांच्या आधुनिक रचनेमुळे तिचा माणसांभोवतीचा अधिवास हरवला आहे. कीटक, धान्य व शिजलेले अन्न खाणाऱ्या इवल्याशा चिऊताईचे भवितव्य प्रदूषणामुळे धोक्‍यात आले आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या तिच्या भावविश्‍वाला उजाळा देण्यासाठी दोन ते तीन दशके भूतकाळात जावे लागेल. कौला...

दहावीत जेव्हा मी काॅपी केली..

दहावीत जेव्हा मी काॅपी केली..  दहावीत भुमितीच्या पेपरला मी एक कॉपी नेली. सर म्हणत होते, "पोराईहो हा प्रश्न पाच मार्कांसाठी येणारच.'' परीक्षा केंद्र होतं खामगाव तालुक्‍यातील एक जिल्हा परिषदेची शाळा. 'निर्रा कॉप्यांचा महापूर.' परीक्षा सुरू झाली की, शाळेत येऊन पालक कॉप्या देत. धाड पथक आलचं तर, ऑफिसात चहा पाण्यात गुंग ठेवल्या जात असे. सर्वांचं अगदी शुद्धीत या प्रकाराकडे लक्ष असायचं. "पण गरीबाची पोरं बिचारी पास होतात तर, होऊद्या" असे "पुण्य घेण्याचे' काम शिक्षक करत.  मोठ्या हिमतीनं मी कॉपी काढली.. अर्ध अधिक गणीत उतरवलं. केंद्रप्रमुख का कुणीतरी ओरडत आलं, ""अरे बुलडाण्याहून पथक आलं. फेका फेका..'' एक चपराशी पोतं घेऊन वर्गात फिरू लागला. पोरं भराभर खिशातल्या कॉप्या पोत्यात रिचवू लागली. मी घाईघाईत जवळ असलेली एकमेव कॉपी खिशात कोंबली होती. ती पोत्यात टाकण्याच्या तयारीत तसा चपराशी ओरडला. ""तोंड काय पायतं.. टाक पटकन.'' क्षणाचाही विलंब न लावता जे खिशात असेल ते मी पोत्यात फेकलं. नंतर लक्षात आलं, हॉलतिकीट अन्‌ वीस...